#खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचा निर्णय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात 11 गावात मोठ्या प्रमाणात कुंभार बांधव राहतात. दि. १५ एप्रिल रोजी गावपातळीवर संत गोरा कुंभार पुण्यतिथी गावागावात साजरी केली जाते. त्यामुळे तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या मासीक बैठकीत दि. १९ एप्रिल रोजी शिवस्मारकात भव्य प्रमाणात पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार होते. बैठकीच्या प्रारंभी सचीव परशराम पालकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ठ केला. बैठकीत जमा खर्चाचा आढावा घेतल्यानंतर सर्वानुमते तालुका पातळीवर दि. १९ एप्रिल रोजी भव्य प्रमाणात संत गोरा कुंभार याची पुण्यतिथी भव्य प्रमाणात साजरी करावी असा एकमुखी ठराव समंत करण्यात आला. बैठकीत उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार, मोहन कुंभार, महेश चंदगडकर, जोतिबा कुंभार यांनी आपली मते मांडली. मंडळ बळकट करण्यासाठी गावोगावी बैठका घेणे, मंडळात नेतृत्व बदल करणे, नवीन चेहर्यांना संधी देणे, मंडळाला अर्थिक पाठंबळ मिळण्यासाठी तालुकापातळीवर निधी जमवणे यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला दुलाजी कुंभार, यशवंत पालकर, धोडिंबा कुंभार, साईराम चेट्टी, नारायण कुंभार, कृष्णा कुंभार, भरत कुंभार, सातेरी कुंभार उपस्थित होते.
