#सरकारी जागेवर फिश मार्केट, मराठी माध्यमसाठी सरकारी हायस्कूल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात अनेक समस्या आहेत .परंतु गेल्या अनेक वर्षापासुन खानापूर शहरात मराठी माध्यमसाठी सरकारी हायस्कूल व्हावे.तसेच खानापूर शहरात सरकारी जागेवर फिश मार्केट व्हावे. अशा दोन समस्या आता पर्यत सुटल्या नाहीत.
मराठी माध्यमचे सरकारी हायस्कूल!
मराठी माध्यमचे सरकारी हायस्कूल व्हावे.ही खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतुन गेल्या कित्येक वर्षापासुन मागणी आहे. मात्र या मागणी कोणत्याच लोक प्रतिनिधीना यश आले नाही.त्यामुळे खानापूर शहरातील विद्यार्थ्याना खानापूर शहरातील खासगी संस्थाच्या मराठी माध्यमच्या हायस्कूलला हजारो रूपये डोनेशन भरून प्रवेश घ्यावा लागत आहे.वर्षभर कोणत्या ना कोणत्या पध्दतीने विद्यार्थ्याकडुन पैशाची वसुली केली जाते.,त्यामुळे गरीब पालकाना मुलाना शिक्षण देताना नाकेनऊ येत आहेत.
दुसरीकडे खासगी हायस्कूलमुळे एस सी , एस टी विद्यार्थ्याना मोफत शिक्षण मिळत नाही.सरकारी स्काॅलरशिप मिळत नाही.तरी खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल व्हावे. असे एका ही लोक प्रतिनिधीना वाटले नाही.हे खानापूर शहरातील जनतेचे दुर्भाग्य आहे. तरी यापुढे तरी मराठी माध्यमचे हायस्कूल व्हावे.अशी मागणी खानापूर शहरातील जनतेची आहे.एकीकडे कन्नड माध्यमचे हायस्कूल होते. मग ८० टक्के मराठी भाषिक जनतेचे मते घेऊन काय उपयोग असा प्रश्न मराठी जनतेतुन होत आहे.
सरकारी जागेवर फिश मार्केट व्हावे!
खानापूर शहरात सरकारी जागेवर फिश मार्केट व्हावे.अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासुन मासे विक्री करणार्या व्यापारातुन होत आहे.
या संदर्भात फिश मार्केट संघटनेच्यावतीने मल्लेशी पोळ यांच्याहस्ते नेतृत्वाखाली तहसीलदार दुंडाप्पा कोमार व चिफ आँफिसर संतोष कुरबेट याना निवेदन ही दिले आहे.
या निवेदनाची दखल घेऊन चिफ आँफिसर संतोष कुरबेट याच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तीन ठिकणच्या सरकारी जागेची पाहणी केली असुन खानापूर जांबोटी रोडवरील अँग्रीकल्चर आँफिस व सीडीपीओ आँफिस मधील माळजागा,तर खानापूर पारिश्वाड रोडवरील बसस्टॅड मागील लक्ष्मीनगर क्राॅसजवळील सरकारी जागा तसेच बेळगाव पणजी रोडवरील हेस्काॅम कार्यालयाच्या समोरील पी डब्ल्यू डी खात्याच्या जागा ,यातील एका जागेवर कायमस्वरूपी फिश मार्केटची सोय व्हावी.अशी मागणी फिश मार्केट संघटनेने केली आहे.यासाठी सोमवारी दि.१६ मार्च पर्यंत निर्णय झाला नाही तर खानापूर बंद ची हाक देण्यात आली आहे.
अशा दोन समस्या खानापूर शहरातील आहेत या दोन्ही समस्या लवकरात लवकर सुटाव्यात अशी मागणी खानापूर शहरातील नागरीकांतुन होत आहे.
