#खानापूर तालुक्यात माणसावरअस्वलाचे हल्ले वनखात्याला नवीन नाही!वनखाते म्हणते.

संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिजंगलाचा तालुका म्हणून ओळखला जातो. अलीकडे जंगली प्राण्याचे हल्ले वाढले आहेत.जंगलभागात असलेल्या खेड्यातील नागरीकाना आपला जीव धोक्यात घालुन जीवन जगावे लागते.मात्र वन खाते जंगली प्राण्याकडुन होणार्या हल्ल्यापासुन नागरीकाना संरक्षण देण्यास अपय़शी ठरले आहे.म्हणून वन खाते म्हणते अस्वलाचे हल्ले नवीन नाही.लोकप्रतिनिधीना याचे दु:ख नाही.
.त्यामुळेच तालुक्याच्या जंगलभागातील शेतकर्याच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
कोकणवाडा( ता.खानापूर ) येथील शेतकरी महादेव सातेरी देसाई ( वय ५९ ) हे रात्रीच्यावेळी शिवारात पिकाची राखण करायला गेले असता.चिकूच्या झाडावर बसलेल्या अस्वलाने जोरदार हल्ला करून त्याच्या डाव्या पायाचा लचका काढला.मोटे या सिताफीने अस्वलाच्या तावडीतुन सुटका करून घरी आले. लागलीच रातोरात खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करून प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथे खाासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याघटनेची माहिती मिळताच आरएफओ श्रीकांत पाटील यानी आपल्या सहकार्यासह खानापूर सरकारी दवाखाण्यात जाऊन विचारपूस केली.ही घटना ताजी असतानाच
सोमवारी लोंढ्याजवळील माचाळी गावच्या शेतकर्यावर शेतीकडे असताना झुडूपात लपून बसलेल्या अस्वलाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
यात माचाळी ( ता.खानापूर ) गावचे शेतकरी बाबल खांडेकर (वय.५५) गंभीर जखमी झाला आहे. मात्र या शेतकर्याने अस्वलाचा हल्ला होताच प्रतिकार करून त्याच्या हल्ल्यातुन शेतकरी बालाबाल बचावले.परंतु अस्वलाच्या हल्ल्यात शेतकर्याच्या मांडीवर मोठी जखम झाली असुन लागलीच त्याना लोंढ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल करण्यात आले.व त्यानंतर वनखात्याला त्वरित हल्ल्याची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच लोंढा आरएफओ तेज पी.वाय.यानी शेतकर्याची भेट घेऊन विचार पुस केली.
या ची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई याना मिळताच त्यानी जंगलभागातील शेतकर्यानी सतर्कता ठेवून जंगली प्राण्यापासुन सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकर्यावर अस्वलाचा हल्ला”