संदेश क्रांति न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात भाजप पक्षाचे कार्य गेल्या कित्येक वर्षापासुन करत असलेले खानापूर तालुका भाजपचे मा जी अध्यक्ष संजय कुबल यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.
भाजपचे राजाध्यक्ष बी.वाय.,विजेंद्र यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील यानी बेळगाव जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष व जेष्ठे नेते संजय कुबल यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याविषयीचे अधिकृत नियुक्तपत्र सुभाष पाटील यानी शनिवारी दि.७ मार्च रोजी जारी केले आहे.
या वेळी नियुक्ती पत्रात जिल्ह्यात पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी तसेच तळागाळातील कार्य अधिक प्रभाविपणे राबविण्याच्या उद्देशाने ही नियुक्ति करण्यात आल्याचे नियुक्ति पत्रात नमुद करण्यात आले आहे.
नव्याने देण्यात आलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत पक्षाचे संघटन गावागावत मजबूत करावे.तसेच आगामी राजकीय आव्हानाना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्याना प्रेरित करून पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे त असे नम पद केले आहे.
नियुक्तिपत्र देताना माजी आमदार संजय पाटील, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद को चेरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
