#दोन दिवस चालणार सोहळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील यडोगा ये थे सालाबाद प्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वर पाराय़ण सोहळा सोमवारी दि.९ व मंगळवारी दि.१० असे दोन चालणार आहे.
श्री एकनाथ षष्ठी निमित्त वेदांत चक्रवर्ती श्रीमंत जगदगुरू तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज कै. श्रीमंत जगदगुरू वैकुंठवासी तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज पंढरपूर याच्या कृपाशिर्वादाने नाना साहेब वासकर महाराज यांच्या अधिष्ठनाखाली व मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी ७ वाजता पोथी स्थापना, महा पूजा,सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वरी अध्ययन वाचन ,सायंकाळी गाथ्यावरील अभंग,नाम जप,किर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी दि.१० रोजी पहाटे काकड आरती, सकाऴी काला कीर्तन,दुपारी महाप्रसादाचे आयोजन त्यानंतर दिंडी सोहळा हो ऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या वेळी पुजाविधी कार्यक्रमाला हभप गंगाराम नांदुरकर उपस्थित राहणार असुन. माऊली मुर्ती पुजा आमदारा्च्याहस्ते होणार असुन. दिप प्रज्वलन भाजपा कर्नाटक राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी व इतर मान्यवराच्या हस्ते होणार. आहे.
तरी भाविकानी , वारकर्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम पंचायत कमिटी व पंच कमिटीने केलेआहे.
