#आरएफओ श्री नदाफ प्रमुख पाहुणे!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा नुकताच उत्साहात पार पडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष एफ एम पाटील होते.व्यासपिठावर सचिव डॉ डी ई नाडगौडा,संचालक सातेरी पुन्नुचे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन आरएफओ श्री नदाफ उपस्थित होते.
प्रास्ताविक अडमिन सौ दिव्या नाडगौडा यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत प्राचार्य बालकृष्ण हलगेकर यानी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे आरएफओ श्री नदाफ, अध्यक्ष एफ एम पाटील,सचिव डाँ. डी ई.नाडगौडा, संचालक सातेरी पुन्नुचे आदीच्याहस्ते क्रिडाज्योत पेटवून क्रिडास्पर्धाचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना सचिव डाँ.डी ई नाडगौडा म्हणाले की, नियमित खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहते.त्यामुळे विद्यार्थ्याची बौध्दीक पातळी वाढते.तसेच आत्मविश्वास वाढतो.म्हणून प्रत्येक खेळात भाग घ्यावा.नियमित व्यायाम करावा.असे आवाहन केले.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की , स्पर्धेत हार जित ही असतेच विजय झाला. म्हणून गर्व करूनये.अपयश आले म्हणून निराश होऊ नये. सतत प्रयत्न करत राहणे.यश नक्कीच येईल.असे त्यानी सांगीतले. सध्याच्या काळात मुलामध्ये वाढत चाललेल्या स्थूलतेच्या समस्येवर खेळ हा एकच प्रभावी उपाय असल्याचे त्यानी सांगीतले.खेळामुळे एकाग्रता वाढुन अभ्यासात ही प्रगती साधता येते.असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन नेटबाॅल स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झालेल्या खेळांडुचे विशेष अभिनंदन केले.
या वेळी उपस्थित मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी वार्षिक क्रिडा स्पर्धा पार पडण्यासाठी प्राचार्य बाळकृष्ण हलगेकर, अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा व सर्व शिक्षकानी तसेच व्यवस्थापन आदीनी विशेष परीश्रम घेतले.यावेळी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

