#वनखाते काय करते!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात वर्षभर हत्तीचा धुमाकुळ सुरूच आहे. त्यामुळे वर्षभरात शेतकर्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे शासनाचे तसेच वनखात्याचे साफ दुर्लक्ष होत आहे.
गेल्या चार दिवसापासुन नेरसे ( ता. खानापूर ) येथील शेतकरी माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई यांच्या ऊसाच्या शिवारात हत्तीनी धुमाकुळ घालुन पिकांचे प्रचंड नुकसान केले.विशेष हत्ती भर दिवसा दुपारी चार वाजता ऊसाच्या पिकात दत्त झाल्याने नेरसे परिसरातील शेतकर्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे.भर दिवसा हत्ती शिवारात आल्याने शेतकरी व महिला वर्गाना शेतात जाणे धोक्याचे झाले आहे.
नेरसेच्या माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई शिवारात ऊस पिकाबरोबर केळीच्या बागेचे प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे त्याना आर्थिक फटका बस ला आहे.नेरसे भागातुन हत्ती घालवा .अशी मागणी वनखात्याकडे याभागातील नागरीकांतुन होत आहे.
#आंबोळी,बांदेकरवाडा याभागात ही हत्तीकडुन पिकांचे नुकसान !
आंबोळी,बांदेकरवाडा,निलावडे भागातील शिवारात हत्तीनी वर्ष भरा पासुन पिकाचे नुकसान केले आहे.गेल्या चार दिवसापासुन हत्तीनी याभागातील ऊस, केळी ,मिरची पिकांचे नुकसान केले.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायत सदस्य यानी संबंधित आरएफओना हत्तीनी पिकांचे नुकसान केले तर याकडे दुर्लक्ष करता. आणि जर एखाद्या शेतकर्याने वन खात्याच्या चंदन प्लांट मधील दोन झाडे तोडली तर कायदाकडे बोट दाखवुन त्या शेतकर्याला झेलची हवा दाखवता.खानापूर तालुक्यातील जंगल भागातील शेतकर्याने जंगली प्राण्याची शिकार केली तर त्याचेवर गुन्हा नोंद करून त्याला झेलला पाठविता.मात्र जंगली प्राण्याकडुन पिकांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले तर त्या शेतकर्याना न्याय नाही.हा तुमचा कायदा आहे काय? असा सवाल करत तुम्ही तुमच्या जंगली प्राण्याना सांभाळा असा सज्जड इशारा त्यानी दिला.

