#हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्यात विविध समस्यावर चर्चा!
#बेळगावचे अधिकारी प्रविणकुमार चिकाडे यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बिडी ( ता. खानापूर ) येथील शेतकरी राजाप्पा चंबाण्णा हलशी यांच्या दुभती म्हैस सन २०२३ साली विधुत भारीत तारेच्या स्पर्शाने ठार झाली. त्यामुळे हेस्काॅम खात्याकडुन नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रूपयाचा धनादेश शनिवारी दि.२१ रोजी हेस्काॅम कार्यालयात बोलविलेल्या ग्राहक मेळाव्यात बेळगावचे अधिकारी प्रविणकुमार चिकाडे यांच्या उपस्थितीत खानापूर हेस्काॅमचे कार्यनिर्वाहक अधिकारी प्रविण बळगार यांच्याहस्ते देण्यात आला.
प्रारंभी हेस्काॅमेचे अधिकारी प्रवीण बळगार यानी बेळगावच्या हेस्काॅमचे अधिकारी प्रविणकुमार चिकाडे यांचे स्वागत केले.
या वेळी हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्यात अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी करंबळ,बिडी, हिरेआब्रोळी,
हिरेहट्टीहोळी, केरवाड,आदी गावच्या विविध समस्या वर चर्चा करण्यात आली.
यामध्ये करंबळ गावचे सुभाष घाडी यांच्या शेत जमिनीतील विधुत कनेक्शन चा प्रश्न चर्चेत घेण्यात आला व त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
सुरेश घोषानट्टी यांच्या किराणी दुकानात वापरण्यात आलेल्या वीजपुरवठ्याबाबत दंडात्मक कारवाई बाबत चर्चा करण्यात आली.
केरवाडचा शेतकरी जगदिश लादीमठ यांच्या शेतात टी सी समस्या सोडण्यावर चर्चा झाली.
यावेळी ग्राहक मेळाव्यात एईटी सिधू अंगडी,सेक्शन आँफिसर नागेश दौलतकर,जावीद नाईकवाडी,भरतेश नागनुर,श्री.चक्रीमठ,शिवू मुरगो़ड,लक्ष्मिकांत रंगणात, बिडीचे एस ओ.श्री संतोष, श्री धर्मादास व खानापूर हेस्काॅम कार्यालयाचे राजू पारेकर आदी उपस्थित होते.

