सन १९६४-६५ सालच्या विद्यार्थ्याचे स्नेह मेळावा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा हायस्कूल लोंढा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीत तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून शाळेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. यानंतर यावर्षीचा इयत्ता दहावी मध्ये बेस्ट बॉय म्हणून मंजुनाथ करीलगेकर तर बेस्ट गर्ल म्हणून मुक्तेश्वरी कानर यांची घोषणा करण्यात आली. याचबरोबर गतवर्षी कन्नड तसेच मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेचे बक्षीस तसेच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील. म्हणाले शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी आपण निश्चितच पुस्तकाच्या पलीकडे गेले पाहिजे व पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आपण विद्यार्थ्यावर संस्कार केले तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना खरे शिक्षण मिळते. तर 1962 साली दुर्गम भागातून येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून लोंढा येथे शिक्षण संस्था सुरू केली. व आजवर 7223 विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेऊन कैक विद्यार्थ्यांनी देशा बरोबर विदेशातही लोंढा हायस्कूलची ज्ञानपताका उंचावून भक्कमपणे ते देशाचे व विदेशाचेही आधारस्तंभ बनलेले आहेत असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लोंढा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक नेसरीकर तर मुख्य अतिथी म्हणून मुंबईतील ज्येष्ठ मराठी अभिनेते शशिकांत दत्तात्रय गंधे तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र नाईक, सेक्रेटरी संतोष भुतकी तसेच लोंढा हायस्कूलच्या प्रथम एसएसएलसी 1964 65 चे विद्यार्थी व विद्यार्थिनी श्री प्रकाश जुवळी, श्री सुरेश देसाई श्रीमती पद्मावती अमृतसकर, श्रीमती विजया परुळेकर श्रीमती चंद्रकला सावंत तसेच माजी विद्यार्थी व भारतीय रेल्वेचे सीनियर इंजिऩिअर श्री नामदेव वीर ,लोंढा ग्रामपंचायतचे अध्यक्ष श्री निळकंठ उसपकर. व मुख्याध्यापक श्री एन डी पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते 1964 65 च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 50 हजार रुपये किंमतीचे झेरॉक्स मशीन देण्याचे आश्वासित केले. लोंढा एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक ,अनेक मान्यवर, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते, यावेळी प्रमुख पाहुणे शशिकांत गंधे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षकांच्या सूचनांचे व दिलेल्या ज्ञानाचे अनुसरण करून जीवनात कसे यशस्वी व्हावे याविषयी मार्गदर्शन केले व श्री अशोक नेसरीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ शिक्षक नारायण गावडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी लोंढा हायस्कूलचे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे देणगीदार श्री सागर मारुतीराव फडतरे व लोंढा एज्युकेशन सोसायटीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे देणगीदार श्री काशिनाथ उर्फ नितीन पंडित यांचेही आभार मानण्यात आले
