संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावातील रामलिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
महाशिवरात्रीनिमित्त पहाटे अभिषेक घालुन महापूजा पार पडली. त्यानंतर सकाळी ८ वाजता, शिवलिंग वरील मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापणा भटजीच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर विधिवत पुजा व मुर्ती शृंगार होऊन भाविकाना तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले .
या वेळी गावातील अबाल पासुन वृध्दापर्यत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंचमंडळी, उपस्थित होते.

