#पक्षाच्या जनता समावेशाच्या पूर्व तयारी संदर्भात चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जेडीएस पक्षाच्या जनता समावेशाच्या पूर्व तयारी संदर्भात जेडीएस पक्षाच्यावतीने खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात पत्रकार परिषद पार पडली.
या वेळी बोलताना जेडीएसचे नेते नासीर बागवान म्हणाले की , माजी मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारचे उच्च , भारी उधोग व खनिज संपत्ती मंत्री एच डी कुमारस्वामी तसेच जनता दलाचे राज्याध्यक्ष राज्याध्यक्ष निखिल कुमारस्वामी यांच्या आदेशानुसार कित्तुर सह कर्नाटकातील सात जिल्हांचा समावेश असलेला भव्य जनता समावेश दि.२७ फेब्रुवारी रोजी विजापूर ये थे आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या जनता समावेशाला सुमारे एक लाखाहुन अधिक लोकाना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा व माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यानी कर्नाटकातील राज्यातील शेतकरीवर्गासाठी मोठे योगदान दिले आहे.असे सांगीतले.
या वेळी जेडीएस चे जिल्हाध्यक्ष शंकर मडलगी म्हणाले सी, जिल्हातील १८ विधानसभा मतदार संघाचा दौरा हाती घेतला असुन पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी खानापूर जे डी एस ची पत्रकार परिषद नेते नासिर बागवान नेतृत्वाखाली देण्यात आली .
या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, येत्या दि. २७ फेब्रुवारी रोजी विजापूर ये थे कुमारस्वामी यांच्या उपस्थित जनता समावेशाचे आयोजन करण्यात आले असुन या सभेला पक्षाचे कार्यकर्ते ,समर्थक मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष यल्लापा कातगार, विरय्या हिरेमठ, परशुराम मादार, वासु तलवार,यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
