#भाविकाना तीर्थ प्रसादाचे वाटप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील ग्रामदैवत माऊली मंदिराजवळ असलेल्या कलमेश्वर मंदिरात व रामलिंगेश्वर मंदिरात रविवार दि.१५ रोजी सालाबाद प्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त सकाळी साडे सहा वाजता अभिषेक व त्यानंतर विधिवत पुजा करण्यात आली.
यावेळी विधिवत शिवलिंगावरील मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापन करण्यात आली.शिवरात्री उत्सव निमित्त दर्शनासाठी
आलेल्या सर्व भाविकाना तीर्थ प्रसाद वाटप करण्यात आले.सायंकाळी गर्लगुंजी भजनी मंडळातर्फे मंदिरासमोर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकानी एकच गर्दी केली होती.
