संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर वकील संघटनेच्यावतीने जेष्ठ वकील अँड.अरूण सरदेसाई यांचा ७५ वा वाढदिवस मंगळवारी दि. १७ रोजी पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाॅक. काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी उपस्थित होते.तर कार्यक्रमाला अँड.एच. एन.देसाई, अँड.जी.एम. देसाई,अँड.एस एन .लोटूलकर,अँड. एन.ए.पाटील, अँड. सुरेश भोसले,पडीत पाटील,नवीन सुनगार,अँड. एम.ए.मुल्ला,अँड.एस. आर.तारीहाळकर,अँड.केशव कळेकर, आदी वकील उपस्थित होते.
या वेळी वकील संघटनेच्यावतीने अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्याहस्ते जेष्ठ वकील अँड.अरूण सरदेसाई यांचा ७५ व्या वाढदिवसा निमित्त शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की, आमचे जेष्ठ वकील अँड अरूण सरदेसाई यानी वयाच्या ७५ व्या वर्षीही वकील सेवा करत आहेत. त्यानी गेली ४० वर्षे वकीली सेवा करून गोर गरीब कुटूंबाना न्याय मिळवून दिला.तसेच सीमा प्रश्नासाठी त्यानी अनेक आंदोलनात भाग घेऊन तुरूंगवास भोगला. कित्येकवेळा सीमा प्रश्न सोडवणुकासाठी उपोशन ही केले. त्याना गेल्या ४० वर्षाचा वकीलीचा अनुभव आहे.आज ते ७५ वर्षे ओलांढुन ७६ वर्षात पदार्पण केले आहे.आज कोर्टाची कामे तसेच वकील करत आहेत. त्याना शतायुष्य लाभो सदिच्छा त्यानी व्यक्त केली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अँड.अरूण सरदेसाई म्हणाले की, खानापूर वकील संघटनेेेने आज माझा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. याबद्दल मी कृतज्ञ झालो.असे सांगुन गेल्या ४० वर्षातला वकीली पेशातला अनुभव, काही प्रसंग त्यानी सांगुन मागील आठवणीना उजाळा दिला.व सर्वाचे आभार मानले.
कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे चेअरमन विनायक मुतगेकर , राजेश पाटील आदी उपस्थित होते. आभार अँड. एच.एन. देसाई यानी मानले.
