#विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदा ही करंबळ ( ता.खानापूर ) गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री धोंडदेव देवाचा वार्षिक यात्रोत्सव आज मंगळवारी दि.१० फेब्रूवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे.
यानिमित्त मंगळवारी दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विधीवत पुजा आर्चा होणार आहे.त्यानंतर दिवसभर भाविकाकडुन नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तर रात्री ८ वाजता सर्व भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा श्री धोडदेव दर्शनासाठी व महाप्रसादासाठी खानापूर तालुक्यातील विविध गावाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रोत्सव कमिटीने केले आहे.