संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील चिगुळे गावची ग्राम देवता व नवसाला पावनारी श्री देवी म्हातारीबाय मंदिराचा तिसरा वर्धापनदिन सोमवारी दि.९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
सोमवारी दि.९ रोजी सकाळी ८ वाजता श्रीम्हातारीबाय देवी व श्री माऊलीदेवीला अभिषेक पुरोहित विनायक प्रयाग पित्रे यांच्याहस्ते होऊन , सकाळी १०वाजता श्रीदेवी म्हातारीबायच्या चांदीच्या मोहराचा मुखवटा ढोल ताशांच्या गजरात आणि दिंडी पथकासमवेत श्रीमाऊली मंदिराकडुन श्रीदेवी म्हातारीबाय मंदिराकडे प्रस्थान करण्यात आले.दुपारी श्रीम्हाताराबायी मंदिरासमोर नविन बांधण्यात आलेल्या स्टेजचे पुजन व उदघाटन सौ.व श्री.उत्तम चोर्लेकर यांच्याहस्ते पार पडले. तर दुपारी ३.३० वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम, पार पडला. तर रात्री भजनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
उद्या मंगळवारी विविध कार्यक्रम!
मंगळवारी दि.१० रोजी सकाळी महाभिषेक आरती,नैवेद्य व विधी.सकाळी श्रीदेवी म्हातारीबायच्या चांदीच्या मोहर्याचा मुखवटा,सत्यनारायण पुजा,त्यानंतर तीर्थ प्रसाद होईल.दुपारी महाप्रसादाचे आयोजन होईल,सायंकाळीओटी भरण्याचा कार्यक्रम त्यानंतर भजनीचा कार्यक्रम रात्री सत्कार समारंभ व सभेचे आयोजन.त्यानंतर सवाल या कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक ,सामाजिक कार्यकर्ते गणपत गावडे हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे उदघाटन अशोक गावडे,अनंत चौगुले,रेमा घाडी,भीमराव गावडे,चंद्रकांत नाईक
दत्ताराम गवस, तानाजी हरिजन यांच्याहस्ते होणार आहे.
दिप प्रज्वलन महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आम दार अरविंद पाटील,एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, मा जी आमदार अनिल बेनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, अमित पाटील आदीच्या हस्ते होणारआहे. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन होणार आहे.
