संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित, श्री पार्श्वमती विद्यालय, अकोळ येथे शैक्षणिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या व्हाईस चेअरमन सौ.अनिता रामगोंडा पाटील या अध्यक्षस्थानी होत्या, यांनी आमच्या शाळेत विविध सोयी आहेत. तसेच इथे शिकून गेलेल्या मुलीही उच्च पदावर आहेत. आता मुलींच्या बरोबर मुलांचीही शाळा सुरू करण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे,तरी मुली बरोबर मुलांनाही पाठवून सहकार्य करा. असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. त्रिशला संजय पाटील (यड्रावकर) यांनी मराठी शाळेतून मिळणारे जे शिक्षण आहे ते आपल्या जीवनाचा पाया भक्कम करते. ही शाळा माझे मामा श्री.रामगोंडा रायगोंडा पाटील यांच्याच घरी सुरुवातीला होती. मी स्वतः या शाळेतील शिक्षण पाहिले आहे. तरी तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा असे मनोगत व्यक्त केले.
पी.बी. आश्रम स्तवनिधीचे कार्यकारी संचालक, श्री. महावीर देवगोंडा पाटील यांनी पार्श्वमती शाळा ही शील, ज्ञान, प्रेम,सेवा, व्यवस्था या समंतभद्र महाराजांच्या पंचसूत्री वर चालते. आता आमच्या या शाळेत मुलांनाही प्रवेश सुरू आहे आणि शाळेचे नाव आतापर्यंत श्री पार्श्वमती कन्या विद्यालय, अकोळ होते,आता ते नाव श्री पार्श्वमती विद्यालय,अकोळ असे करण्यात येईल.असे मार्गदर्शन केले.
अकोळ गावकामगार पाटील , श्री. रामगोंडा रायगोंडा पाटील यांनी आता शाळेमध्ये विविध सुविधा आहेत, आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. असे मार्गदर्शन केले.
अकोळ ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. इंद्रजीत सोळांकुरे यांनी गरीब विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणारी शाळा म्हणजे पार्श्वमती, तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेत पाठवा असे मार्गदर्शन केले. प्रशालेची इ.8 वीची विद्यार्थिनी कु. श्रावणी जम्बूकुमार रांगोळे हिने इतिहासात थोडं वळून पहा या शाळेतील अनेक माजी विद्यार्थिनी उच्च पदावर काम करत आहेत.या शाळेत संस्काराने घडविण्याचा प्रयत्न केला जातो. असे मनोगत व्यक्त केले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता दहावी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. एस .पाटील सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्या सौ. त्रिशला संजय पाटील (यड्रावकर) यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.रामगोंडा रायगोंडा पाटील (उर्फ राजू अण्णा) यांची श्री.देशभूषण हायस्कूल, कोल्हापूर येथील कार्यकारी मंडळाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
श्री.पी.बी आश्रम स्तवनिधीचे कार्यकारी संचालक, श्री. महावीर देवगोंडा पाटील यांची बाहुबली विद्यापीठ संचलित, श्री.भरतेश विद्यालय,बेल्लद बागेवाडी येथे संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
अकोळ ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. इंद्रजीत सोळांकुरे यांचा सन्मान व प्रशालेच्या व्हाईस चेअरमन सौ. अनिता रामगोंडा पाटील यांचा सन्मान तसेच शाळेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या पालकांचा, गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा, व प्रशालेचे माजी मुख्याध्यापक,माजी शिक्षक,माजी विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात आला.
शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थी पारितोषिक वितरणाचे वाचन सौ. व्ही.डी इंदलकर मॅडम यांनी केले. प्रशालेचे सेक्रेटरी श्री. डी. बी.मगदूम,संचालक श्री. ए. के. व्हनशेट्टी, संचालक श्री.एस. बी. पाटील, संचालक श्री.आर.बी. पाटील, संचालिका सौ. एस.व्ही. रांगोळे वहिनी, श्री.ए. बी. सोळांकुरे, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. बी.जी खोत सर, श्री.बी.जी परीट सर, माजी शिक्षिका श्रीमती. एस. ए.कठारे मॅडम, सौ.एस.ए.खोत मॅडम, सर्व पालक वर्ग,आजी-माजी विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पी.बी. कळंत्रे यांनी,तर श्री. एस.डी खोत यांनी आभार प्रदर्शन केले.

