#अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अति जंगलभागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या सन २०२० ते २०२५ या पाच वर्षात अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्यांनी ग्राम पंचायत क्षेत्रात विकास साधुन कार्य केले.
त्यांचा पाच वर्षाचा काल नुकताच संपला.
त्यानिमित्त निलावडे ग्राम पंचायत सभागृहात अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष अरूण गावडे होते.व्यासपिठावर उपाध्यक्षा सौ.पार्वती मुतगेकर (दारोळी ) सदस्य विनायक मुतगेकर (कांजळे),महादेव कवळेकर(निलावडे),परशराम गावडे
(ओतोळी).सहदेव पाटील (कापोली,के.सी.)
सदस्या सौ.आरती कांबळे( निलावडे),
सौ.लक्ष्मी नाईक (आंबोळी),सौ.रेणुका शेंगाळे ( ओतोळी )आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक ग्राम पंचायतीचे क्लार्क लक्ष्मण देसाई यानी केले. तर पी डी ओ श्री. मोकाशी यानी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना माजी उपाध्यक्ष विद्यामान सदस्य विनायक मुतगेकर बोलताना म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सर्व सदस्यांच्या सहकार्याने निलावडे ग्राम पंचायती च्या क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते, गटारी , पाणी, विज पुरवठा सुरळीत व्हावा.यासाठी प्रयत्न करून समस्या मार्गी लावल्याआहेत.
एवढेच नव्हेतर कबनाळी रस्त्याच्या ९०० मीटर अंतराच्या रस्त्यासाठी ७५ लाख रूपये निधी पीएमजीएसवाय प्लॅन मधुन मंजुर करण्यासाठी प्रयत्न केले.तसेच कबनाळी गावावळील सी डी साठी ६५ लाखाचा निधी मंजुरीसाठी प्रयत्न केला आहे.याजबरोबर कान्सुली क्राॅस ते निलावडे क्राॅस पर्यतच्या रस्त्याच्या पॅचवर्क कामासाठी पी डब्लू डी खात्याकडे प्रयत्न केला आहे. असे सांगुन बेळगाव जिल्ह्यातच नरेगा योजनेंतर्ग कामे निलावडे ग्राम पंचायती ने सर्वाधिक कामे केलेली असुन केवळ या सदस्याच्या सहकार्यातुन विकास साधला आहे.असे सांगीतले.त्याच बरोबर निलावडे ग्राम पंचायतीची इमारत जांबोटी भागात एक आदर्श इमारत उभारण्याची इच्छा बोलुन दाखविली.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष अरूण गावडे यानी बोलताना सांगीतले की , गेल्या पाच वर्षात आम्ही सर्व सदस्य एकमेकाच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक गावाचा विकास करण्यास खुप प्रयत्न केले.तालुक्यातच निलावडे ग्राम पंचायतीने साधलेला विकास इतर ग्राम पंचायती पेक्षा चांगल्या दर्जाचा आहे.कारण निलावडे ग्राम पंचायतीच्या सदस्यानी एकमेकाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे पाच वर्षे कशी निघुन गेली हे कळलच नाही.असे सागीतले.
यावेळी ओमाणा नाईक यानी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी पीडीओ श्री मोकाशी यानी अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी आज पर्यत जे सहकार्य केले. त्यामुळेच निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गावाचा विकास होऊ.शकला. त्यामुळेच तालुक्यात निलावडे ग्राम पंचायतीची विकास कामे दिसुन आली आहेत. याबद्दल मला अभिमान वाटतो.
असेच सहकार्य या पुढे द्याल, अशी आपेक्षा केली.
या वेळी सेक्रेटरी राजू तलवार यानी ही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार लिपिक लक्ष्मण देसाई यानी मानले.

