संदेश क्रांती न्युज:
खानापूर प्रतिनिधी
देसूर ( ता.,बेळगाव )श्री काशेश्वर दत्त मंदिर येथे श्री दत्तात्रय स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव मार्ग शीर्ष पौर्णिमेनिमित्त ४ डिसेंबर रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.
गुरूवारी सायंकाळी ५.४५ वाजता श्री दत्ता नाम गजराने मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरूवात होईल,
बुध वाली दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता झा़डशहापूर येथे श्री दत्त पालखी प्रदेक्षिणा आहे. जन्मोत्सवदिनी पहाटे ४ते६ वाजेपर्यत प्रात:स्मरण ,सुदर्शन, स्तोत्र ,गोविंद स्तवन या सह महाभिषेक व महापूजा होणार आहे.त्यानंतर मनाचे श्लोक, श्री हरि भजन ,पाद्यपूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
दुपारी १ ते ३.३० वाजता ‘श्री दत्त जन्मोत्सव’ विषयावर प्रवचन होणार असुन सायंकाळी जन्मोत्सव सोहळा, पंचायती व तीर्थ प्रसाद होईल. सायंकाळी आणि रात्री इदलहोंड येथील श्री पिसेदेव भजनी मंडळ ,झाडशहापूर. ग्रामस्थासह श्रीब्रह्मलिंग भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे.
