“एम एल सी शांताराम सिधी यांना वकील संघटनेच्यावतीने निवेदन”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गवाळी, पास्टोली, मेंडील ,कृष्णापूर ,अबनाळी, जामगाव, हेम्माडगा, पाली ,देगाव ,कोंगळा, केळील, गवळीवाडा, डोंगरगाव ,तेरेगाळी,होलडी, नेरसा , शिरोली , शिरोलीवाडा मागिनहाळ, हणबरवाडा आमगांव चिखळे तळेवाडी जांबोटीवाडा, सडा ,मान, विजयनगर,हुळंद, कापोलीवाडा ,आंबेवाडी आदी गावाचे १५ लाख रूपये दे ऊन स्थलांतर करण्याचा कुटिल डाव आहे.
परंतु गेली कित्येक वर्षे या गावातील रहिवाशीना पक्के रस्ते ,पिण्याचे पाणी,आरोग्य सेवा,वीज, व इतर मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.असे असताना केवळ १५ लाख रूपये देईऩ स्थलांतर करण्याला नागरीकाचा विरोध आहे.असे असताना नागरीकानी सरकारच्या कोणत्यी ही अमिषाला बळी पडु नये. असे आवाहन खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाटी यानी मंगळवारी दि.२ रोजी हेम्माडगा (ता.खानापूर) येथे अरण्य रहिवासी हितरक्षण समितीच्यावतीने आयोजित समालोचन सभेत बोलताना व्यक्त केले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, या गावच्या नागरीकांच्या पाठीशी खानापूर वकील संघटना सदैव पाठीशी राहुन.योग्य तो न्याय नक्कीच मिळवुन देईल असे आश्वासन दिले. या वेळी वकील संघटनेच्यावतीने एम एल सी शांताराम सिधी याना निवेदन सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागापा नारायण गावडे होते.तर व्यासपिठावर एम एल सी शांताराम सिधी,माजी आम दार सुनील हेगडे, अँड.ईश्वर घाडी,अँड. चेतन मणेरीकर,अँड.एच.एन.देसाई, समितीचे नेते विलास बेळगावकर,भाजपचे प्रमोद कोचेरी, संजय कुबल,सुरेश देसाई, भैरू पाटील ,
,वाघू पाटील,पंडित ओगले, विनायक मुतगेकर, सुभाष देशपांडे,ग्राम पंचायत अध्यक्षा गीता मादार, निलन मादार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत दिपक गवाळकर यानी केले.
प्रारंभी पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
या वेळी याभागातील भालचंद्र दळवी,महादेव शिरोडकर,अप्पू शिंदे,अशोक देसाई नेरसा, कृष्णा गुरव, विजय मात्र आदीनी याभागातील समस्या पटवुन दिल्या.
त्यानंतर प्रमोद कोचेरी, संजय कुबल, अँड.,चेतन मणेरीकर, विलास बेळगावकर, माजी आमदार सुनिल हेगडे तसेच एमएलसी शांताराम सिधी सर्वानी याभागातील समस्या व नागरीकाचे जीवन याबद्दल जोरदार चर्चा केली.
शेवटी एम एल सी शांताराम सिधी यानी आरण्य रहिवासी हित रक्षण समितीच्या समस्या बेळगाव येथे होणार्या हिवाळी अधिवेशनात मांडुन न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक गवाळकर यानी केले.तर कृष्णा गुरव यानी आभार मानले.


