संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
श्री पार्श्वमती विद्यालय अकोळच्या वतीने संविधान दिनानिमित्त पथनाट्याच्या आणि प्रभात फेरीच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात आली .
संविधानाची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यानी सकाळी अकोळ गावातून प्रभात फेरी काढली . यावेळी संविधानासंदर्भात वेगवेगळ्या घोषणा देत आणि फलकावर घोषणा लिहिलेले फलक घेऊन इयत्ता आठवी, नववी व दहावी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रभात फेरीत सहभागी झाले होते . प्रभात फेरीच्या वेळी गावात ठीक ठिकाणी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘जनजागृती संविधानाची’ हे पथनाट्य सादर केले . अकोळच्या ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले . झेंडा चौकातील पथनाट्याच्या वेळी अकोळ ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकूरे , तरुण उद्योजक रितेश रामगोंडा पाटील , बापूसाहेब कट्टीकल्ले पाटील, भरत अशोक पाटील, एम. बी . एस . , के.बी.एस. आणि एम .जी.एस. चे विद्यार्थी शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक उपस्थित होते . सर्वांनी पथनाट्यात अभिनय केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले . फेरी सुरळीत पार पाडण्यासाठी संचालक मंडळ आणि शिक्षकानी परिश्रम घेतले .
