संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नुकत्याच हसन येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत बेळगाव विभागीय हॉकी संघ उपविजेता ठरला असून या हॉकी संघात खानापूर मराठा मंडळच्या हायर सेकंडरी स्कूलच्या दोन अव्वल दर्जाच्या खेळाडूंची या विभागीय संघामधून राष्ट्रीयपातळीवर निवड झाली.
. या विभागीय हॉकी संघातील कुमारी सानिका मनोहर पाटील आणि श्रेया पाटील नेहमीच हाॅकी प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या .
सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रतिभावंत खेळाडू कुमारी सानिका मनोहर पाटील हिच्या अष्टपैलू खेळामुळे तिची आता निर्विवादपणे राष्ट्रीय पातळीवर वर्णी लागली आहे .
मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर. राजश्रीताई नागराजू यादव यांनी अभिनंदन केले आहे.
सदर खेळाडूंना संचालक शिवाजीराव पाटील तसेच ज्येष्ठ संचालक परशुराम अण्णा गुरव,शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी या सर्वांचे प्रोत्साहन मिळत आहे शिवाय क्रीडा शिक्षक तसेच हॉकी कोच गणपत गावडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
खेळाडूंचे खानापूर तालुक्यातुनअभिनंदन होत आहे.
