#प्रांताधिकाऱ्यांचीही उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नूतन तहसीलदार मंजुळा नाईक यांची नियुक्ती झाली. तालुक्यातील नेते मंडळी त्यांचे स्वागत केले. केवळ दहा-बारा दिवसात जुने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या बदलीला स्थगिती मिळवली.
बुधवार दिनांक 26 रोजी दुपारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खानापूर तहसील कार्यालयात हजेरी लावून खुर्चीवर ताबा मिळवला.
याच वेळी नूतन तहसीलदार मंजुळा नायक कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी तहसीलदार खुर्चीचा ताबा मिळवला. यावेळी काही फाईल्सवर सह्या सुद्धा केल्या.
याचवेळी नूतन तहसीलदार मंजुळा नायक यांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. व त्यांना सह्या करण्यास विरुद्ध दर्शविला . जर न्यायालयाचा आदेश असला तरी सरकार या दिवशी प्रत घेऊन या. असे सांगत खुर्चीवरून उठण्यास सांगितले.
मात्र तशिलदार दुंडाप्पा कोमार यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिला बराच वेळ खुर्चीवर बसून कामकाज चालू ठेवले. तर नूतन तहसीलदार मंजुळा नाईक या उपतहसीलदारांच्या खुर्चीवर बसून आपला अहवाल वरिष्ठांच्याकडे सादर केला.
याचवेळी प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक हे भू लवाद मंडळीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी दोन्ही तहसीलदारांना खानापूरच्या तहसीलदार खुर्चीच्या प्रतिष्ठेची जाणीव करून दिली. व वरिष्ठांच्या आदेशांची वाट पाहून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. खानापूर तालुक्याच्या लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले.मात्र यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
याचवेळी तहसील कार्यालयात उपस्थित असलेले खानापूर वकील समितीचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी बोलताना म्हणाले की, दुंडापा कोमार यांना उच्च न्यायालयाचा आदेश मिळाला असला तरी. तहसील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारावा का याबाबत महसूल सचिव निर्णय घेतील तोपर्यंत प्रांताधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांचे गैरसोय होणार नाही यासाठी कार्यालयीन जबाबदारी ग्रेट टू तहसीलदार यांच्यावर देऊ शकतात. असे मिळत मांडले.
खानापूर तहसील कार्यालय हे नेहमीच चर्चेत असते याचे आजचे एक उदाहरण आहे.
