पशुवैद्यकीय उपसंचालक याना निवेदन.!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बाहेरीच्या जिल्ह्यातून अनेक शेळ्या मेंढ्या चे कळप खानापूर तालुक्यात येत असतात.लाळ्या खुरकत चे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात. त्यामुळे उपाय योजना करावी लंपि सुद्धा पूर्ण पने प्रतिबंधित नाही. त्यामुळे गाई, बैला आधी जणांवरावर परिणाम जास्त आढळतात. त्यावर ही तालुक्यातील शिल्लक गावा मद्ये लसीकरण करून घ्यावे. आणि या दोन्ही रोगा बदल शेतकरी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी,अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालक याना दिले. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुळट्टी आणि लाईव्ह स्टॉक अधिकारी गुरव उपस्थित होते.याच बरोबर पशुवैद्यकीय खात्याकडून पुरविल्या जाणाऱ्या योजना सर्व नागरिका पर्यंत पोहचवा. आणि तळागळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. या विषयी ही चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण केल्याबद्दल पशूवैद्यकीय खात्याचे अभिनंदन प्रसाद पाटील यांनी केले.
यावेळी नामदेव कोलकार,कल्लपा लोहार,सुनील कोलकार,जोतिबा सुतार,सतीश बुरुड,गणेश देसाई,ओमकार कुंभार,सुरेश पाटील उपस्थित होते.
