संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल येथे शाळेच्या एन् सी सी छात्रा कडून दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
एन् सी सी छात्र व एन् सी सी ऑफिसर पी. पी. काशीद आणि एन् सी सी ऑफिसर बी. आर. कुडसोमनवर यांच्या उपस्थितीत शाळेपासून प्रभात फेरी मार्फत जनजागृति करण्यात आली . यामध्ये एकून 100 एन् सी सी छात्राचा सहभाग होता.
यासाठी मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती डॉक्टर. राजश्रीताई नागराजू यांचे प्रोस्ताहन लाभले तसेच संस्थेचे संचालक परशूरामअण्णा गुरव व शिवाजीराव पाटिल यांच्या सदिच्छा आणि शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही . कुलकर्णी आणि शाळेच्या सर्व शिक्षकांचे व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
