संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता. खानापूर ) येथील लोंढा शिक्षण संस्थेच्या सन 2025 ते 2030 सालाकरिता नूतन कार्यकारणीची बैठक पार पडली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रवीण शहापूरकर उपस्थित होते
बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व कार्यकारणीची बिनविरोध निवड पार पडली.
यावेळी अध्यक्षपदी अशोक नेसरीकर, उपाध्यक्षपदी नरेंद्र नाईक तर सेक्रेटरी पदी संतोष भुतकी यांची बिनविरोध निवड करण्यात आली
तसेच कार्यकारिणी पदी 1) नाना अंगडी 2) प्रवीण शहापूरकर 3) संभाजी गवाळकर 4) राम परुळेकर 5) विनय महालंक 6) सौ अनुराधा शहापूरकर 7) राजू हेब्बालकर 8) संतोष जोशी 9) सुरेश देसाई 10) बाबुलाल पटेल यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
लोंढा शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.