#ऊस वाहतूकदार शांताराम पाटील यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात ऊस उत्पादनाचे क्षेत्र प्रतिवर्षी वाढत असून खानापूर तालुका ऊस उत्पादनात अग्रेसर झाला आहे. खानापूर तालुक्यात जवळपास 12 ते 15 लाख टन उसाची लागवड केली जाते.खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला आहे. जंगली प्राण्यांचा उपद्रव्य असे असतानाही उसाचे उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतच आहे.
असे असताना खानापूर तालुक्यातून बेळगाव शुगर्स,सतीश शुगर्स, साखर कारखान्यासह इतर कारखान्यांना दररोज दहा ते बारा ट्रक ऊस वाहतूक केली जात आहे. तालुक्याच्या नेरसा, बिडी, कक्केरी, जांबोटी मुगवडे मोदेकोप नागुर्डा काटगाळी गणेबैल सह तालुक्याच्या विविध भागातून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी माहिती ऊस वाहतूकदार शांताराम पाटील मणतुर्गा यांनी बोलताना सांगितले.
सध्या खानापूर तालुक्यात ऊस वाहतूक जोरदार चालू आहे. तालुक्याच्या विविध भागातून ऊस तोड टोळ्या दत्त झालेल्या आहेत. खानापूर मार्गे बेळगावच्या दिशेने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर जाताना दृष्टीस पडत आहेत.
अवघ्या पंधरा दिवसात एक लाख टन ऊस गाळप बेळगाव शुगर्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात जास्तीत जास्त ऊस खानापूर तालुक्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय खानापूर तालुक्यातील उसाची उचल मोठ्या प्रमाणात होत आहे.
जाबोटी परिसरात ऊस वाहतुकीला जोर!
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगली प्राण्यांपासून सुटका करून घेण्यासाठी या भागातून उसाची उचल लवकर होत आहे.त्यामुळे खानापूर जांबोटी रस्त्यालगत असलेल्या शिवारातील उसाची उचल महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.
खानापूर तालुक्याबाहेरील साखर कारखान्यांना ऊसाची वाहतूक!
खानापूर तालुक्याबाहेरील अनेक साखर कारखान्यांनी सध्या उसाची उचल मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यामध्ये बेळगाव शुगर्स, सतीश शुगर्स,बल्लद बागेवाडी शुगर्स ,बैलहोंगल शुगर्स ,निपाणी शुगर्स नलवडे शुगर्स, संकेश्वर शुगर्स, नलावडे शुगर्स, (यूकेकेन), हल्याळ शुगर्स आदी अनेक साखर कारखान्यानी खानापूर तालुक्यातील उसाची उचल करताना ऊस वाहतूक ट्रकांचे दर्शन होत आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील उसाची उचल लवकर होऊन शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळणार आहे. व शेतकरी उसाच्या व्यापातून लवकर मुक्त होणार आहेत.
