#शाळा परिसरात तंबाखू, गुटखा व मद्य नसाजन्य पदार्थांना बंदी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी.
केंद्र सरकारने चालवलेल्या नशा मुक्त भारत अभियान खानापूर तालुका शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी निडगल व गर्लगुंजी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सादर केले.
नशा मुक्त भारत अभियान हे प्रत्येक राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे.शाळा आवरण परिसरात तंबाखू,गुटखा व मद्य या सारख्या नशाजन्य पदार्थांना बंदी असून जवळपास विक्रीला देखील बंदी आहे.तसेच केंद्र सरकारच्या नशा मुक्त भारत अभियानाद्वारे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत.युवक हेच राष्ट्रीचे आधारस्तंभ आहेत.तेंव्हा आपण सर्वांनी आपल्या देशाला नशा मुक्त बनविण्यासाठी प्रतिज्ञा करुया असे आवाहन खानापूर तालुका क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यांनी निडगल येथील सरकारी प्राथमिक शाळेत नशा मुक्त भारत अभियान मधील विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिल्या नंतर सांगितले.
यावेळी क्षेत्र समन्वयक अधिकारी एम जी हत्ती,बीआरपी शंकर कम्मार, कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चिगुळकर,निडगल शाळेचे शिक्षक सुब्बाराव पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.निडगल शाळेचे मुख्याध्यापक मादार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
