#कदंबा फाउंडेशन अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस, फादर बेनिटो पिंटो यांचे प्रयत्न!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
संगरगाळी ( ता. खानापूर) गावच्या वृद्धांना तसेच अपंगांना महिन्याचे रेशन मिळण्यासाठी संगरगाळीपासून चार किलोमीटर असलेल्या गुंजी येथील रेशन दुकानाला जाण्यासाठी धडपड करावी लागत असे. अशावेळी संगरगाळी चर्चचे फादर बेनिटो पिंटो हे आपल्या वाहनातून संगरगाळीच्या वृद्धांना तसेच अपंगांना घेऊन जाऊन रेशन आणत होते. परंतु प्रत्येक वेळी सवड मिळणे कठीण होत होती. यासाठी कदंबा फाउंडेशनचे चेअरमन जॉर्डन गोल्साल्विस यांच्याशी फादर बेनिटो पिंटो यांनी चर्चा करून यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील फुड इन्स्पेक्टर उदय खातेदार यांच्याशी संपर्क साधून संगरगाळी वृध्दाना व अपंगांना त्यांच्या घरापर्यंत रेशन पाठवण्याची विनंती केली.
यावेळी तहसीलदार कार्यालयातील फूड इन्स्पेक्टर उदय खातेदार यांनी दर महिन्याला गुंजी येथील रेशन दुकानातून संगरगाळीतील वृद्धांना व अपंगांना रेशन देण्याची सोय करतो. असे आश्वासन दिले.
यापुढे संगरगाळी गावच्या वृद्ध जेबेलिन लिमा वय ८२,नेकेलिन लिमा वय ८२,कोसुमारी कारी वय.८७,पस्कीन दलिया वय.८७, जकिन लिमा वय.७३,लुयडा मस्करीन वय७०.तसेच अपंग मिना लिमा वय.४२ आदिना घरपोच रेशन दिले जाणार आहे.
अशी माहिती कदंबा फाउंडेशनचे चेअरमन जॉर्डन गोल्साल्विस यांनी दिली आहे. या सोयीमुळे संगरगाळी गावच्या नागरिकातून समाधान पसरले आहे.
