संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तीकडून पिकांचं नुकसान सतत सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे.
काल गुरुवारी दि. २० रोजी रात्री पाच हत्तीनी शिरोलीवाडा शिवारात सुरेश नाटके यांच्या पाच एकर जमीनीतील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
हत्तीनी ऊस खाण्यापेक्षा ऊस तुडवून ऊसाचे प्रचंड नुकसान केले आहे.
मात्र वनखात्याचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
तर दुसरीकडे नुकसान भरपाई तुटपुंजी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
सध्या भात सुगीच्या हंगामाला सुरुवात झाल्याने व हत्तीच्या कळपाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या वर एक संकट ओढवले आहे.
तेव्हा शेतकऱ्यांच्या नुकसान ऊस पिकाची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.
