संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील नगर पंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांच्या कडून दिवाळी निमित्त मिठाई वाटप नुकताच करण्यात आले.
ऊन असो की पाऊस खानापूर नगर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी सणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे खानापूर मंडळ उपाध्यक्ष आणि स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीचे चेअरमन अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनी आज सफाई कामगारांना मिठाईचे वाटप केले. आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक नारायण ओगले, विद्यानगर येथील शिवराय युवक मंडळाचे अध्यक्ष संदीप शेमले उपस्थीत होते.


