” खानापूरच्या विद्यानगरात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखाव्याचे उद्घाटन”
“खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी!
#प्रमुख वक्ते भाजप युवा नेते पंडित ओगले!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखाव्याचे उद्घाटन सोमवारीही दिनांक 20 रोजी पार पाडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी उपस्थित होते.
तर प्रमुख वक्ते भाजप युवा नेते पंडित ओगले हजार होते. कार्यक्रमाला खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, सामाजिक कार्यकर्ते महादेव मरगाळे,फॉरेस्टर सुनील मुतगेकर, सी वाय.मादार, मोहन गोरल श्री चिनवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृती चे उद्घाटन खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी भाजप युवानेते पंडित ओगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले.
यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले की ,आजच्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास आवगत असने गरजेचे आहे.यासाठी किल्ल्याच्या देखाव्यातुन माहिती करून घेतली जावी.असे आवाहन केले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मागोवा घेऊन सविस्तर माहिती दिली.
खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी युवकाना अभ्यासाबरोबर इतिहास जाणून घेण्याचे आवाहन केले. व मंडळाला एक हजार रुपयाची देणगी जाहीर केली. यावेळी उपस्थित पाहुण्यानी मंडळाला देणगी देऊ केली.
कार्यक्रमाला विद्यानगरातील बालगोपाल, युवक ,नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


