#१५ हत्तींचा कळप!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका अति जंगलाने व्यापलेला तालुका आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचे सतत त्रास होत असतात. सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत ऐन सगीच्या काळात खानापूर तालुक्याच्या गोधळी परिसरातील बाळगुंद ,मास्केनट्टी आधी भागात नागरगाळी जंगलातून जवळपास 15 हत्तींचा कळप मस्केनट्टीच्या शिवारात दाखल झाला आहे.
दरवर्षी सुगी च्या काळात या भागात हत्तीच्या आगमन होत असते. यावर्षी हत्तींच्या आगमनाने हातातोंडाशी आलेले भात पिकाचे तसेच उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
पंधराहुन अधिक हत्ती असून कळपात नर व मादी सह सात ते आठ हत्तीची पिल्ले आहेत. तर तीन हत्तीचा कळप दिवसाढवळ्या बाहेर पडत आहे. तसेच दोन टस्कर स्वतंत्र वावरत आहेत. अशा जवळपास 15 हत्तीं कडून ऐन सुगीच्या काळात आता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे तसेच उसाचे नुकसान होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेल्या उभ्या पिकाचे शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत नुकसान होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा टाकला आहे. वन खात्याने शेतकऱ्यांच्या मरण जीवनाचा कधी विचारच केला नाही. त्यांच्या पिकाचं होणार नुकसान कधी भरून काढले नाहीत.
एकीकडे जंगल वाचवण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांच्या पोटावर मारण्याची वेळ वन विभाग करत आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम करत आहेत. यावर कधी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार केला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.
जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन खात्याने कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे


