#नगराध्यक्षा सौ.मीनाक्षी बैलुरकरयांच्या हस्ते पूजन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी सात वाजता खानापूर शहरात कित्तूर राणी चन्नम्मा वीर ज्योतीचे आगमन झाले.
खानापूर शिवस्मारक चौकात वीर ज्योतीचे आगमन होताच खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी बैलुरकर यांच्या शुभहस्ते वीर ज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराधक्ष सौ सौ मीनाक्षी बैलूरकर यांनी पुष्पहार घालून व आरती ओवाळू पूजन केले.
नंदगड तालुका खानापूर येथून कित्तूर राणी चन्नम्मा वीर ज्योतीच्या आगमनाला प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी खानापुरात आगमन झाले.
यावेळी खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मीनाक्षी बैलूरकर,नगरसेवक प्रकाश बैलूरकर, चीप ऑफिसर संतोष कुरबेट, श्री सनदी, राजू जांबोटकर, तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, खानापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


