संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा बुधवार दिनांक 14 रोजी जिल्हा क्रीडांगणावर पार पडल्या.
या कुस्ती क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याच्या सात तालुक्यातील 250 खेळाडूंनी भाग घेतला होता.
यामध्ये खानापूर मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या खेळाडूंनी कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत या संपादन केले आहे.
तनुजा गुरव हिने सतरा वर्षाखाली 49 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तर भक्ती गवडा हिने 43 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच राधिका चाळगोंडे 14 वर्षाखालील 50 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
यावेळी पंच म्हणून बेळगावचे कोच हणमंत पाटील, नागराज पाटील, सुनील थांनब, चंद्रकांत गोमानाचे यांनी काम पाहिले. यावेळी क्रीडा अधिकारी श्रीमती मिरजी उपस्थित होत्या.
विजय खेळाडूचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांनी अभिनंदन केले. विजय खंडूना क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.
कुस्ती स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे खानावळ तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
