संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिंनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा पंधरावा स्थापना दिन उद्या मंगळवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून बेळगाव सरकारी टीचर्स कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक एन. के काळे हे उपस्थित राहणार आहेत. तर अतिथी म्हणून शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे चेअरमन व श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी चे व्हाईस चेअरमन प्राध्यापक भरत तोपिनकट्टी, तसेच शांतिनिकेतन व प्री. युनिव्हर्सिटी व डिग्री कॉलेजचे चेअरमन व श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्राध्यापक बंडू मजुकर, त्याचबरोबर श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्राध्यापक राजेंद्र एस. पाटील व जॉईट सेक्रेटरी महादेव बांदीवडेकर आणि इतर संचालक उपस्थित रहाणार आहेत.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्या स्वातीकमल वाळवे यांनी केले आहे.