#26 ऑक्टोंबर रोजी पथसंचलन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात रविवारी दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचालन कार्यक्रमाच्या जागृतीसाठी खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोड, मिशनरी कंपाऊंड, मुरगोड प्लॉट स्वाती भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन जागृती करण्यात आली.
यावेळी रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ.सुदर्शन सुळकर यांच्या घरी जाऊन आर एस एसचे सुभाष देशपांडे, राजेंद्र रायका,जी एम बेन कट्टी, नारायण ओगले, राजू पार्सेकर,बाबू शेट्टी, मुणगेकर, रवि बडीगेर आदींनी जागृती केली.
सोमवारी विद्यानगर, मयेकर नगर या भागात जागृती फेरी करणार आहेत.
