संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात लोंढा तालुका खानापूर येथील कित्तूर कुटुंबीयांच्या सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. त्या कित्तूर कुटुंबाच्या घरी जाऊन खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली.
यावेळी कित्तूर कुटुंबीयांनी सदर घटनेची माहिती दिली. खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी कित्तूर कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
यावेळी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या समवेत अब्दुल मोकाशी ,विलास गावडे , सादिक इनामदार संभाजी पाटील तसिन मुल्ला, बबन दळवीं, शोभा मादार, लक्ष्मी चोर्लेकर, राधा उत्तुरकर आधी उपस्थित होते.
