#तहसीलदारांना निवेदन!
#एक दिवस कोर्ट कामकाज बंद!
संदेश क्रांती न्यूज:
,
खानापूर प्रतिनिधी
दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात काम काज दरम्यान भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर पोट फेकल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिनांक ८ रोजी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर केले.
तर एक दिवस कोर्ट कामकाज बंद ठेवण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हे कृत्य निंदनीय आहे. न्यायालयाच्या प्रतिष्ठेला कलांकित करण्याचा प्रयत्न आहे. तर त्या कृत्याचा निषेध करायला हवा आहे. म्हणून
खानापूर वकीलच्या वतीने तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन निषेध व्यक्त केला.
यावेळी निवेदनाचा स्वीकार तहसीलदार धुडाप्पा कोमार यांनी करून निवेदन सरकार दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी अँड. पी एन बाळेकुंद्री त्यांनी प्रस्ताव मांडला. तर अँड. एच एन देसाई व एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी बुधवारी दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून कोर्ट काम बंद करण्यात आले.
निवेदन देताना वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, उपाध्यक्ष अँड के जी कळळेकर, सचिव अँड एम वाय कदम, खजिनदार अँड जी जी पाटील, अँड चेतन मनेरिकर, एस के नंद गडी, सिद्धार्थ कपिलेश्वरी सुरेश भोसले, रुद्र गौडा पाटील, श्री लंगोटी श्री हेरेकर सुरेश लो टू कर, स्वाती पाटील ,सुरेखा उप्पीन इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
