“आंबोळी गावात वाल्मिकी जयंती साजरी “
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अलीकडे युवकांनी मोबाईलच्या मागे धावून आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेण्यापेक्षा वाल्मिकी सारख्या थोरांचे चिंतन करावे. जेणेकरून वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, याची माहिती मिळेल.
आजच्या युवक युवतींना वडिलांच्याकडून महागडया मोबाईलची मागणी होते. अशावेळी वडिलांनी कर्ज काढून मुलांच्या मोबाईलची सोय करावी. आणि मुलांनी त्या मोबाईलच्या मागे लागून आपल्या जीवन वाया घालू नये.
असे विचार सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे यांनी आंबोळी ( ता. खानापूर) गावच्या वतीने मंगळवार दिनांक ७ रोजी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात प्रमुख व्यक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन पाटील होते. व्यासपीठावर निलवाडे ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर , अर्जुन नाईक राजू कांबळे , शंकर शास्त्री माजी सदस्य, ओमाणा नाईक पि के पी एस सदस्य, तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी नाईक, आदी उपस्थित होते.
यावेळी दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत सदस्य विनायक मुतगेकर म्हणाले की निलावडे ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही अडचणीला मी स्वतः पुढाकार घेऊन अडचण दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. कोणत्याही व्यक्तीच्या अडचणीच्या वेळी मी स्वतःहून हजर असतो. तर रस्ता, शाळा इमारतीसाठी, बस वाहतूक या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. गावच्या विकासासाठी मी सतत कार्यरत राहीन असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण गावडे, रमेश देसाई, शंकर शास्त्री ,लक्ष्मण देसाई आदीनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला राजेश पाटील,रामचंद्र पाटील, रमेश नाईक बबन नाईक लक्ष्मण नाईक नारायण नाईक दाखल नाही रेशम नाईक नामदेव कुडसेकर, राजू पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा जनाबाई नाईक आधी उपस्थित होते.
