#मिशनरी कंपाउंड येथे दौडीचे स्वागत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात दुर्गामाता दौडीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 रोजी पहाटे साडेपाच वाजता मोठ्या उत्साहाने दौडीला प्रारंभ झाला.
यावेळी शिवस्मारकातुन दौडीचा शुभारंभ करण्यात आला. मिशनरी कंपाऊंड येथे दुर्गामाते दौडचे स्वागत करण्यात आले.
स्वागत वेळी सुहासिनींनी आरती ओवाळून दवडीचे स्वागत केले. दौडीच्या स्वागताला मिशनरी कंपाउंड मधील रहिवासी भाजप नेते राजेंद्र रायका, आर आर पाटील, चेतन राय का, इतर मान्यवर मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच बालगोपाळ उपस्थित होते
त्यानंतर दौडीला पोलीस कॉटर्स, श्री नाग मंदिर, दुर्गा नगर, दुर्गा रोड, वाजपेयी नगर,
आदी भागात स्वागत होऊन दौडीची सांगता दुर्गा देवी मंदिरात मोठ्या उत्साहाने करण्यात आली
