“सोसायटीची 33 वी वार्षिक सभा संपन्न”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत भरून सोसायटीने सहकार्य करणे फार महत्त्वाचे आहे. तरच सोसायटीचा व्यवहार पारदर्शक ठरतो. असे झाले तरच सोसायटीच्या हिता बरोबरच गांभीर्याने विचार केला तर सहकार क्षेत्र टिकेल.
सभासद हेच सोसायटीचे केंद्रबिंदू आहेत. सभासदांनी सहकार्य केले तर सोसायटीची प्रगती होते. असे विचार सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर यांनी जांबोटी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 33 व्या वार्षिक सभेत अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो भजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक अण्णासाहेब कुडतुरकर, पांडुरंग नाईक , शाहू गुरव, यशवंत पाटील, भैरू पाटील, विद्यानंद बनोशी, रायाप्पा काजुनेकर, हनुमंत काजूनेकर, पुंडलिक गुरव ,भाऊ कुर्लेकर , भरमानी नाईक,जी. व्ही. इंगळे , संचालिका सरस्वती पाटील व सल्लागार मंडळी उपस्थित होते.
यावेळी अहवाल वाचन संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांनी केले. मागील इतिहास वृतांत वाचन सेक्रेटरी दिलीप हनुरकर यांनी केले. तर बैल शाखेचे मॅनेजर गजानन नाकाडे यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. तसेच खानापूर शाखेचे मॅनेजर सूर्यकांत यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले
. यंदाच्या अंदाजपत्रकाचे वाचन राधा दळवी यांनी केले.
मान्यवरांचा सत्कार!
सोसायटीचे प्रामाणिक कर्जदार व ज्येष्ठ सभासद यांचा सत्कार.
सोसायटीचे प्रामाणिक कर्जदार ज्योतिबा चौगुले सुधाकर गावडे आप्पांना दळवी लोगो तर ज्योतिबा को वाडकर विठ्ठल देसाई पांडुरंग चिरोळकर सरस्वती बेळगावकर गंगुबाई येडगे यांचा जट सभासद म्हणून सत्कार करण्यात आला.
सोसायटीचा वृत्तांत!
सोसायटीला यंदा निवळ नफा 22 लाख 22 हजार 807 रुपये इतका झाला आहे.
खेळते भांडवल 43, 24, 94 ,620, इतके आहे. भाग भांडवल 1,06 ,47 ,050, ठेवी-39,64,27,387, गुंतवणूक-3,17,28,386, वार्षिक उलाढाल-95,73,14,992. कर्ज-32,92,91,714, राखीव निधी व इतर निधी-2,43,06,992.
सोसायटीचे अ वर्ग सभासद 1750, क वर्ग सभासद 857, इतकी आहेत.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, बाबुराव भरणकर, शिवाजी हसनेकर ,शामराव साबळे ,बाळू किनारी, अर्जुन गावडे ,शिवाजी हसनेकर रामा कालमनकर. उपस्थित होते. आभार संचालक यशवंत पाटील आणि मानले.
