#स्पर्धा तीन गटात होणार असुन मुली मुलीसाठी खास व्यवस्था!
संदेश क्रांती न्यूज :
(सुहास पाटील)
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल,शांतिनिकेतन ज्यूनिअर काॅलेज,व शांतिनिकेतन डीग्री काॅलेज यांच्यावतीने ” श्री महालक्ष्मी ग्रुप मॅरेथाॅन रेस” स्पर्धांचे आयोजन उद्या रविवार दि.२४ रोजी सकाळी सात वाजता शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर खास खानापूर तालुका मर्यादीत करण्यात आली आहे.
या स्पर्धा तीन गटात विभागलेल्या असुन मुला मुलीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
- १४ वर्षाखालील गटासाठी ३ कि.मी. अंतर.
- १७.५ वर्षाखालील गटासाठी ५ कि.मी. अंतर .
- १७ .५ वर्षावरील खुल्यागटासाठी १० कि.मी.अंतर.
या स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिके घेऊन विजय मिळविणार्या शाळेला जनरल चॅपियनशी देण्यात येणार आहे.
विजयी स्पर्धकाना बक्षिसे खालील प्रमाणे!
- १४ वर्षा खालील विजयी स्पर्धकाना : पहिले बक्षिस रू.२५०० ,दुसरे बक्षिस रू. २००० ,तिसरे बक्षिस रू१५००; व त्याचबरोबर ५ उत्तेजर्नाथ बक्षिसे प्रत्येकी ५०० रू.
- १७.५ वर्षाखालील विजयी स्पर्धकाना पहिले बक्षिस रू.३०००,दुसरे बक्षिस रू. २५००; तिसरे बक्षिस रू.२२५० ,त्याच बरोबर उत्तेर्जनार्थ ५ बक्षिसे प्रत्येकी रू ५००;
- १७.५ वर्षावरील खुला गट पहिले बक्षिस रू ५,००० ; दुसरे बक्षिस रू.३,०००; तिसरे बक्षिस रू.२,००० त्याचबरोबर उत्तेजनार्थ ५ बक्षिसे प्रत्येकी रू.५००
तरी इच्छूक स्पर्धकानी आपली नावे मो. नंबर ९५९१७९४२३८,८१२३६४४१०६ या क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.