#नगराध्यक्षा सौ व श्री बैलुरकर दांपत्यांच्याहस्ते पुजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर नगरपंचायतीच्यावतीने दर्श पिठोरी अमवस्येचे औचित्य साधुन शुक्रवारी दि.२२ रोजी मलप्रभा नदीच्या काठावर गंगा पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी खानापूर शहरातील प्रसिध्द भटजी शार्दूल जोशी यांनी विधीवत पुजा केली. तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलूरकर,नगरसेवक प्रकाश बैलूरकर याना पुजेचा मान देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्याहस्ते मलप्रभा नदीवर गंगा पुजन करण्यात आली.
कार्यक्रमाला अर्बन बॅकेचे निवृत्त मॅनेजर श्री जोशी, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलुरकर,उपनगराध्यक्षा सौ जया भुतकी, स्थायी कमिटी चेअरमन आपय्या कोडोळी, नगरसेवक प्रकाश बैलुरकर, नारायण ओगले,हणमंतपुजारी,महमदरफिक वारेमणी, नगरसेविका सौ.मेघा कुंदरगी,सौ.लता पाटील, सौ.राजश्री तोपिनकट्टी,फातिमा बेपारी,साहेरा सनदी,तसेच कर्मचारी अभियंते श्री कांबळे,राजू जांबोटी,प्रेमानंद नाईक,व इतर कर्मचारी उपस्थित होते.