#कराटेपटूनी १५ सुवर्ण पदके मिळविली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कराटे पटू खेळांडुनी नुकताच पार पडलेल्या सरकारी तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांकासह १५ सुवर्ण पदके मिळविली.
सुवर्ण पदके विजेती मुले!
अहमद खलिफा, सर्वज्ञ गुरव, आदर्श सावंत, रोहित बावकर, अदित्य बडिगेर, कुमार सुमित,मेहबूब हनगी,तोहिद सय्यद,विठ्ठल गोंधळी,अथर्व चौगुले,
सुवर्ण पदक विजेत्या मुली!
आदित्ती डी.नाडगौडा,सिमरा मुल्ला, ज्ञानेश्वरी साळुंखे,फारिया कित्तूर,सारा बडेघर यांचा समावेश आहे.
तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत तब्बल १५ कराटे पटुनी सुवर्ण पदकासह यश संपादन केल्याने खानापूर तालुक्यात समर्थ इंग्लिश मिडीय स्कूलचे अभिनंदन होत आहे.
विजयी कराटे पटूना कराटे प्रशिक्षक हरिष सोनार यांचे योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
या यशामागे बीडीएसकेएच अध्यक्ष मास्टर राजेंद्र बी काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या सौ.दिव्या नाडगौडा, क्रिडा शिक्षक बाळकृष्ण हलगेकर व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.
विजयी कराटे पटूचे संस्थेचे सचीव डाॅ. डी .ई.नाडगौडा व संचालकानी अभिनंदन केले.