संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पणजी बेळगांव महामार्गावरील शिवस्मारक चौकात जिजाऊ गणेश मंडळाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
सुरूवातील विधीवत पूजा अर्चा करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
पावसाचा जोर असल्यामुळे साध्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिषेक शहापूरकर , उपाध्यक्ष साईश सुतार तसेच विनोद पाटील भूषण पाटील, सुर्यकांत कुलकर्णी , ब्राव्हो, राजू कुडाळे , इसाक खान पठान, दिपक कवठनकर,नगरसेवक तोहीद चांदखण्णावर, भरतेश तोरोजी, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते .