संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काॅलेजात सोमवारी दि.११ रोजी सकाळी ११ वाजता फ्रेशेट्स डे. युनियन व जमखाना उदघाटन, काॅलेज मंत्री मंडळाच्या शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विकास वर्दे, सुहास कुलकर्णी सेक्रेटरी ,प्राचार्य पी के चापगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणावी.असे आवाहन प्राचार्य पी के चापगावकर यानी केले आहे.