संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेंगलोर येथे नुकताच राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धा पार पडल्या.यास्पर्धेत जवळपास १२०० कराटे पटूनी भाग घेतला होता.
तर खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या कराटेपट्टूनी भाग घेऊन यश संपादन केले आहे.
यास्पर्धेत १४ वर्षे वयोगटात कुमार गोणी याने चार फेर्या जिंकुन गोल्ड मिडल मिळविले .तर समर्थ पाटील याने पाच फेर्या जिकून गोल्ड मिडल मिळविले .तसेच ओमकार गावडे याने तीन फेर्या जिंकुन कास्य पदक मिळविले.
तर १३ वर्षेवयोगटातील कृष्णाअलाबादी पाच फेर्या जिंकुन गोल्ड मिडल मिळविले. तर १५ वर्षेवयोगटातील अच्यूतराय नाईक या खेळांडुने चार फेर्या जिंकून कास्य पदक पटकाविले.तर आनंद पाटील याने तीन फेर्या जिंकून कास्य पदक पटकाविले.
त्याचबरोबर याच वयोगटात पृथ्वीराज देसाई खेळाडूने ८० किलो वजनी गटात पाच राऊंड जिंकून गोल्ड मिडल मिळविले .
या खेळाडुनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकाकजुन वाहवा मिळविली.
या कराटे खेळाडूना कराटे कोच मधु पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
यासंस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर प्राचार्या स्वाती वाळवे यानी अभिनंदन केले.