#निवड समिती एकाची करणार निवड!
“आमदार विठ्ठलराव हलगेकर, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी, राजू सिध्दाणी” .
” पत्रकार परिषदेत माहिती.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या डी सी सी बॅकेत परिर्वतन व्हावे. याउद्देशाने खानापूर डी सी सी बॅक उमेदवार्याच्या निवडीसाठी निवड समिती स्थापन केली असुन या निवड समितीकडे आमदार विठ्ठलराव हलगेकर, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी व गर्लगुंजी पी के पी एस माजी चेअरमन विद्यामान संचालक राजू सिध्दानी यानी एक उमेदवार निवडीसाठी निवड समितीकडे अर्ज दिला आहे.
निवड समितीकडुन एक उमेदवार निश्चित केला जाईल असी माहिती निवड समितीचे यशवंत बीर्जे यानी गुरूवारी शांतिनिकेतन येथे बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले खानापूर डीसीसी बॅकेवर गेली २० वर्षे तोच चेहरा आहे. तो बदल व्हावा.बॅकेत परिवर्तन होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले मी सहकार क्षेत्रात चांगला तरबेज आहे. केवळ २ रूपयाच्या फंडावरून ५ ०० कोटी रूपये पर्यत महालक्ष्मी सोसायटी चालविली आहे. असे असताना सहकार क्षेत्रात येऊ नका म्हणतात. यासाठी आम्ही ही निवडणूक लढविणार यासाठी निवड समितीची स्थापना केली आहे.
निवड समिती जो उमेदवार दिल.त्याला निवडुण आणणार आणि खानापूर डीसीसी बॅकेवर नवा चेहरा व बॅक परिर्वतन करणार
तालुक्यातील पीकेपीएस सोसायट्याना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.तेव्हा येत्या १९ आँक्टोबर मध्ये होणार्या डीसीसी बॅकेच्या आमच्या उमेदवाराला निवड आणण्याची जबाबदारी घेतली आहे.
यासाठी खानापूर तालुक्यातील विविध पीकेपीएस सोसायट्याना भेटीगाठी घेतल्या आहेत.यावरून आमच्या उमेदवाराला विजयाची खात्री आहे. यावेळी ते म्हणाले की मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातुन तालुक्यातील रयत संपर्क केंद्रासाठी २५ लाखाचा निधी मंजुर झाला आहे.असे सांगीतले.
यावेळी एमएलसी चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की डीसीसी बॅके गेली २० वर्षे संचालक म्हणून राहुन तालुक्यातील एका युवकाला नोकरी दिली नाही. यावरूनच तालुक्यात कोणती प्रगती झाली हे दिसुन येते.अनेक सोसायटीची पत थांबली. त्यामुळे शेतकर्याचे नुकसान झाले. तेव्हा शेतकर्याना न्याय देण्यासाठी ही निवडणुक लढविणार आहे.
यावेळी गर्लगुंजी पीकेपीएसचे संचालक राजू सिध्दाणी म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिण्यापासुन पीकेपीएस संचालकांच्या संपर्कात असुन यावेळी नक्कीच परिवर्तन होणार. तेव्ह निवडसमिती जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी राहुन ही निवडणुक जिंकणार असे त्यानी सांगीतले.
वेळी पत्रकार परिषदेला मृणाल हेब्बाळकर, आमटे पीकेपीएस चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर,शिवसेनेचे के पी पाटील, भरमानी पाटील,श्रीशैल चिरमुरे, किशोर मिठारी,सुरेश अंगडी,विविध सोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.