#खानापूर डाॅक्टर असोसीएशनचे चेअरमन ,पदाधिकार्याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
डाॅक्टर म्हणजे सामान्य जनतेचा देव असतो. २४ तास जनतेची सेवा हा फक्त डाॅक्टरच करतो.त्यामुळे डाॅक्टराना देवा समान मानतात. म्हणून डाॅक्टराना समाजात मान असतो.
अशाच प्रकारे खानापूर शहरातील प्रसिध्द डाॅक्टर सुनिल पांडुरंग पाटील यांचा वाढदिवस सोमवारी दि २८ रोजी खानापूर डाॅक्टर असोसीएशनच्या चेअरमन व पदाधिकारी याच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅक्टर डी.ई.नाडगौडा म्हणाले की , सतत लोकसेवत आपल्याला वाहुन घेत असताना डाॅक्टर मीत्र आपल्या वैयक्तीक जीवनाकडे साफ दुर्लक्ष करतात.त्यातुन थोडासा विसावा म्हणून वाढदिवसाचे निमित्त करून मित्र परिवार हा सोहळा संपन्न करतात असे मत खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन या नात्याने बोलताना व्यक्त केेले.
यावेळी खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन व पदाधिकर्यानी डाॅ. सुनिल पाटील यांचा वाढदिवस केक कापून केला.
यावेळी वाढिवसाच्या सोहळ्याला खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ.डी. ई. नाडगौडा,.डाॅ.राम पाटील,तसेच कृष्णा मेडिकलचे संचालक अनंत सडेकर,संजू कारेकर,व इतर डाॅक्टर उपस्थित होेते.
यावेळी डाॅ. सुनिल पाटील यानी खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या उपस्थित पदाधिकार्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.