#सोमवारी गर्लगुंजी कलमेश्वर मंदिरात अभिषेक,पुजा,भजन कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील ग्राम दैवत श्री माऊली मंदिराजवळील श्री कलमेश्वर मंदिरात श्रावण मासाचे औचित्य साधुन आज सोमवार दि. २८ जुलै रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने गावातील कलमेश्वर मंदिरात सकाळी सात वाजल्यापासुन शिवलिंग अभिषेक, पूजा, महाआरती व भजनाचा कार्यक्रम पार पडला.
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासुन भाविकानी अभिषेक व पुजेसाठी मोठी गर्दी केली होती.तसेच गर्लगुंजी हभप तसेच गावचे नागरीकासह कलमेश्वर मंदिरात दर्शनासाठी तसेच पुजेसाठी गर्दी केली होती.
यावेळी भाविकानी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले .
गर्लगुंजी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नेते, महिला, हभपनी तसेच शिवभक्तांनी उपस्थित राहून भजानाचा आनंद घेतला.